Mohan Bhagwat : "अमेरिकेने जे नवीन टॅरिफ धोरण लागू केले..."; सरसंघचालक मोहन भागवत यांची अमेरिकेच्या नव्या टॅरिफ धोरणावर प्रतिक्रिया
थोडक्यात
आज विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दसरा मेळावा
सरसंघचालक मोहन भागवत यांची अमेरिकेच्या नव्या टॅरिफ धोरणावर प्रतिक्रिया
"अमेरिकेच्या टॅरिफचा सर्वांना फटका"
(Mohan Bhagwat ) आज राज्यात अनेक पक्षांचे दसरा मेळावे होणार आहेत. नवरात्रौत्सवात 9 दिवस देवीच्या 9 रूपांची पूजा केली जाते आणि दहाव्या दिवशी विजयादशमीचा सण साजरा केला जातो. आज विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दसरा मेळावा पार पडत आहे.
नागपुरातील रेशमबाग मैदानात मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत. यावेळी सरसंघचालक मोहन भागवत यांनी मार्गदर्शन केलं. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लादलेल्या टॅरिफवर भाष्य केलं आहे.
मोहन भागवत म्हणाले की,“अमेरिकेने जे नवीन टॅरिफ धोरण लागू केले आहे. त्यांनी त्यांच्या हितासाठी हा निर्णय घेतला असेल.मात्र याचा फटका सर्वांनाच बसतो आहे. जगात परस्पर संबंध निर्माण करणे गरजेचं आहे. एकटा देश स्वतंत्रपणे वाटचाल करू शकत नाही. पण ही निर्भरता नाईलाज बनू नये."
"आर्थिक प्रणाली कधी बदलेल हे काही सांगता येत नाही. त्यामुळे आपल्याला या गोष्टीला मजबुरी न बनवता जगायचे असेल तर आपल्याला आत्मनिर्भर बनावे लागेल, स्वावलंबी जीवन जगावं लागेल, स्वदेशीचा उपयोग करावा लागेल. सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय संबंधांचं जतन करावं लागेल, मात्र यामध्ये नाईलाज नसावा, सक्ती नसावी, आपली इच्छा असायला हवी." असे मोहन भागवत म्हणाले.