कोकाकोला कंपनीमध्ये काम करणार्‍या कर्मचाऱ्यानी केला महिलेचा विनयभंग; आरोपी अटकेत

कोकाकोला कंपनीमध्ये काम करणार्‍या कर्मचाऱ्यानी केला महिलेचा विनयभंग; आरोपी अटकेत

सध्या मुंबईतील राहणाऱ्या महिलांचा विनयभंग प्रकरण वाढत जात असल्याचा दिसत आहे.

रिध्देश हातीम, मुंबई

सध्या मुंबईतील राहणाऱ्या महिलांचा विनयभंग प्रकरण वाढत जात असल्याचा दिसत आहे. मात्र अशा गुन्हा करणाऱ्या आरोपींना पोलीस ही अवघ्या काही तासात अटक करून त्यांच्यावर कडक कारवाई केली जाते. असाच एक प्रकार अंधेरी परिसरात घडला ज्यात महिलेचा विनयभंग केलेल्या आरोपीला पोलिसांनी 24 तासाच्या आत शोधून काढले.

मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी महिला अंधेरी पूर्व सहार रोड येथून पायी चालत असताना एका अज्ञात व्यक्तीने फिर्यादी महिलेचा विनयभंग केला. घटना घडल्यानंतर महिलेला खूप मोठा धक्का बसला होता मात्र त्या न घाबरता अंधेरी पोलीस ठाण्यात येऊन घडलेल्या घटनेची तक्रार नोंदवली.

गुन्ह्याचे गांभीर्य पाहता पोलिस लगेच ॲक्शन मोड मध्ये येऊन अंधेरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने गुन्हा दाखल झाल्यापासून गुन्हा घडलेल्या परिसरातील व त्या मार्गावरील एकुण प्रायव्हेट कॅमेऱ्याचे ६० ते ७० सीसीटीव्ही फुटेज तपासले. आरोपी हा रेल्वेने प्रवास करणार असल्याचे समजले असता अंधेरी रेल्वे येथील ४० ते ५० सीसीटीव्ही कॅमेरे यांचे अवलोकन केल्याने समजले की आरोपी हा अंधेरी ते गोरेगाव रेल्वेने प्रवास करत आहे. गोरेगाव पूर्व वनराई पोलीस ठाणे हद्दीमध्ये प्रायव्हेट ३० ते ४० कॅमेरे व सरकारी १५ ते २० कॅमेऱ्याचे सीसीटीव्ही फुटेज चे तपासणी केली असता वनराई पोलीस ठाणे येथील गुप्त बातमीदाराला आरोपीचा फोटो दाखविला असता आरोपी हा वनराई येथील एका कोकाकोला च्या कंपनीमध्ये कामास आहे अशी माहिती दिली.

त्या माहितीनुसार कंपनीमध्ये पोलिस गेले आणि तेथे त्यांना समजले की आरोपी हा आज रेल्वेने अहमदाबाद येथे पळून जाणार आहे. आरोपी पळून जाणार आहे अशी माहिती प्राप्त होताच बोरवली रेल्वे स्टेशन येथे जाऊन सापळा रचून आरोपीला ताब्यात घेण्यात आले. अटक आरोपीचे नाव संतोष कुमार विश्वनाथ गिरी (४२) असून आरोपी हा कोकाकोला कंपनीमध्ये काम करत होता. दरम्यान पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com