महायुतीचे उमेदवार नारायण राणेंना मतदान करण्यासाठी पैसे वाटप...

महायुतीचे उमेदवार नारायण राणेंना मतदान करण्यासाठी पैसे वाटप...

7 मे 2024 रोजी रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची निवडणूक पार पडली.
Published by :
Dhanshree Shintre

7 मे 2024 रोजी रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची निवडणूक पार पडली. मात्र, या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार नारायण राणे यांनाच मतदान करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रत्येक गावात मतदारांना पैसे वाटप झाल्याचे निदर्शनास आले. याविषयीची तक्रार रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे आमदार वैभव नाईक यांनी केली आहे.

या संदर्भातील पुराव्यासाठी फोंडाघाट येथील भाजप कार्यकर्ता विश्वनाथ जाधव हा पैसे वाटप करतानाचा व्हिडीओ आपल्याला पाठवत आहे. पैसे देताना हे पैसे नारायण राणे साहेबांनीच दिलेत असे मतदाराला सांगण्यात आले आहे.

दरम्यान, यासंदर्भात सखोल चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नाईक यांनी केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेली मतदारसंघातील ही पहिली तक्रार असल्याने याकडे आता काय निर्णय होतो हे पाहणे महत्त्वाचे आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com