Moong Tikki : प्रोटीनयुक्त मुगाच्या टिक्कीचे 'हे' आहेत आरोग्यदायी फायदे
आजकाल अनेक लोक वजन कमी करण्यासाठी डायटिंग, वर्कआउट्स आणि विविध उपाय करत असतात. पण या प्रक्रियेत बहुतेकांना एक प्रश्न हमखास भेडसावतो. “चविष्ट खाणं बंद करायचं का?”याच प्रश्नाचं चवदार आणि आरोग्यदायी उत्तर आहे. लो फॅट, हाय प्रोटीन मुगाची टिक्की!
ही टिक्की केवळ चविष्टच नाही, तर आरोग्यासाठीही उत्तम पर्याय आहे. तिचा मुख्य घटक म्हणजे हिरवा मूग, जो प्रथिनांचा (Protein) उत्तम स्रोत आहे. शिवाय, त्यात भरपूर फायबर, अँटीऑक्सिडंट्स आणि आवश्यक पोषकतत्त्वं असतात. विशेष म्हणजे ही टिक्की तेलकट नाही, कारण ती कमी तेलात तव्यावर भाजली जाते. त्यामुळे ती लो फॅट (Low Fat) आहे. त्यासोबतच वजन वाढवण्याऐवजी ते कमी करण्यात मदत करते.
रेसिपी आणि पोषणमूल्यं
ही टिक्की तयार करण्यासाठी भिजवलेला हिरवा मूग थोडा वाफवून घेतला जातो. त्यात बारीक चिरलेला कांदा, आले-लसूण पेस्ट, हिरव्या मिरच्या, थोडं बेसन किंवा ओट्स, आणि चवीनुसार मसाले मिसळले जातात. हे मिश्रण टिक्कीसारख्या गोळ्यांमध्ये बनवून, गरम तव्यावर थोड्याशा तेलात दोन्ही बाजूंनी कुरकुरीत होईपर्यंत फ्राय केले जाते.
डायट करणाऱ्यांसाठी वरदान
वजन कमी करताना बहुतांश वेळा लोकांना स्नॅक्ससाठी हेल्दी पर्याय सापडत नाहीत. पण ही मुगाची टिक्की हाय प्रोटीन आणि लो कॅलरी असल्यामुळे शरीराला आवश्यक ऊर्जा मिळते. तसेच पचनक्रियाही सुरळीत राहते. यामध्ये साखर, मैदा, जास्त तेल किंवा कृत्रिम पदार्थ अजिबात वापरले जात नाहीत.
संध्याकाळी चहा बरोबर, किंवा वर्कआउटनंतरचा हेल्दी स्नॅक
ही टिक्की तुम्ही सकाळी न्याहारीला, संध्याकाळी चहा बरोबर किंवा वर्कआउटनंतर प्रोटीनसाठी खाऊ शकता. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांसाठी ही टिक्की उपयुक्त आहे. विशेषतः जेवणाच्या वेळेत काहीतरी हलकं, हेल्दी आणि स्वादिष्ट खावंसं वाटतं, त्यावेळी हा पर्याय उत्तम ठरतो.
चव आणि आरोग्याचा उत्तम मेळ
आजचं आधुनिक आयुष्य झपाट्याने धावत आहे. पण त्यात स्वतःचं आरोग्य सांभाळणं तितकंच आवश्यक आहे. अशा वेळी ही मुगाची टिक्की चव आणि आरोग्याचा संतुलित मेळ साधते. वजन कमी करताना 'चविला रामराम' म्हणण्याची गरज आता नाही. तर मग, उशीर न करता आजच ही टिक्की घरी बनवा आणि ‘गिल्ट-फ्री’ खाण्याचा आनंद घ्या – वजनाची नो फिकर!