मोरबे धरणग्रस्त नवी मुंबईचे पाणी रोखणार; उद्या पाणीपुरवठा बंद करण्याचा इशारा

मोरबे धरणग्रस्त नवी मुंबईचे पाणी रोखणार; उद्या पाणीपुरवठा बंद करण्याचा इशारा

मोरबे धरणग्रस्त नवी मुंबईचे पाणी रोखणार
Published by :
Siddhi Naringrekar

विकास मिरगणे, नवी मुंबई

मोरबे धरणग्रस्त नवी मुंबईचे पाणी रोखणार असल्याची माहिती मिळत आहे. उद्या पाणीपुरवठा बंद करण्याचा इशारा देण्यात आला आहे. मोरबे धरणासाठी जमीन संपादीत करताना शासनाने जी आश्वासने दिली होती ती पूर्ण न केल्याने धरणग्रस्तांनी आक्रमक झाल्याची माहिती मिळत आहे.

27 जूनपासून धरणग्रस्तांनी धरणासमोरील परिसरात साखळी उपोषण सुरु केले आहे. यावेळी आंदोलनाकडे पालिकेच्या कोणीही अधिकारी न फिरकल्याने धरणग्रस्त आक्रमक झाले आहेत.

याच पार्श्वभूमीवर आता मोरबे धरणग्रस्त नवी मुंबईकडे जाणारा पाणीपुरवठा बंद करणार असल्याची माहिती मिळत आहे. तसेच आम्हाला न्याय न मिळाल्यास आगामी विधानसभा निवडणुकांवर बहिष्कार घालण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com