Hingna : प्रशासनाचा ढिसाळ कारभारसमोर
Hingna : प्रशासनाचा ढिसाळ कारभारसमोर, एकाच गरात चक्क 200 मतदार, नेमकं प्रकरण काय? Hingna : प्रशासनाचा ढिसाळ कारभारसमोर, एकाच गरात चक्क 200 मतदार, नेमकं प्रकरण काय?

Hingna : प्रशासनाचा ढिसाळ कारभारसमोर, एकाच घरात चक्क 200 मतदार, नेमकं प्रकरण काय?

हिंगणा मतदारसंघातील वानाडोंगरी नगर परिषद क्षेत्रात एका घरात तब्बल 200 पेक्षा जास्त मतदार दाखवण्यात आले.
Published by :
Riddhi Vanne
Published on

More than 200 voters were shown in one house in the Wanadongri Municipal Council area of ​​Hingna constituency : हिंगणा मतदारसंघातील वानाडोंगरी नगर परिषद क्षेत्रात मतदार यादीत मोठा घोळ उघडकीस आला आहे. प्रभाग क्रमांक पाचमध्ये एका घरात तब्बल 200 पेक्षा जास्त मतदार दाखवण्यात आल्याने एकच खळबळ उडाली होती. मात्र तपासणीत ही बाब चुकीची असल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रशासनाच्या चूकिच्या नोंदीमुळे अनेक रहिवाशांचे पत्ते "घर क्रमांक एक" असे दाखवले गेले. त्यामुळे प्रत्यक्षात वेगवेगळ्या घरांत राहणाऱ्या मतदारांचे नावे एकाच घरात दाखवल्याचे आढळले.

एका माध्यमाच्या रिऍलिटी चेक मध्ये पौर्णिमा सिन्हा, अंबिका बनोटो, रेखा सापकने या रहिवाशांनी आपण त्या परिसरात गेली अनेक वर्षे राहत असल्याचे सांगितले. त्यांचा व त्यांच्या कुटुंबीयांचा मतदार यादीत समावेश योग्य असून, केवळ पत्त्याच्या नोंदीतील चुकांमुळे गैरसमज निर्माण झाल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणावर भाजप आमदार समीर मेघे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, विरोधक निवडणूक जवळ आली म्हणून मुद्दामहून चुकीचा प्रचार करत आहेत. सर्व मतदार स्थानिकच असून बोगस मतदार नाहीत.

वानाडोंगरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी राहुल परिहार यांनी सांगितले की, घर क्रमांक नसलेल्या किंवा अतिक्रमण केलेल्या जागांवर ‘०’ किंवा ‘१’ असा तात्पुरता क्रमांक दिला जातो. त्यानंतर फेरतपासणी करून योग्य माहिती नोंदवली जाते. मतदार याद्यांच्या दुरुस्तीसाठी निवडणूक आयोगाने ९ ते १३ ऑक्टोबर दरम्यान आक्षेप नोंदवण्याची मुदत दिली होती. आता प्राप्त आक्षेपांची पडताळणी करून अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com