मोठी बातमी, मोटरमनचा ‘जादा काम’ बंद आंदोलनाचा इशारा; मुंबई लोकलसेवा कोलमडण्याची शक्यता

मोठी बातमी, मोटरमनचा ‘जादा काम’ बंद आंदोलनाचा इशारा; मुंबई लोकलसेवा कोलमडण्याची शक्यता

मध्य रेल्वेवरील मुंबई विभागातील मोटरमन संघटनांकडून ‘जादा काम’ बंद आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

मध्य रेल्वेवरील मुंबई विभागातील मोटरमन संघटनांकडून ‘जादा काम’ बंद आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. रिक्त पदांमुळे मोटरमनांना जादा कामाचा भार येत आहे. ज्यामुळे त्यांचे मानसिक आणि शारीरिक स्वास्थ बिघडत आहे. तसेच, दीर्घकाळापासून मोटरमनच्या अनेक तक्रारी प्रलंबित आहेत.

याच पार्श्वभूमीवर 4 मेपासून नियमांनुसार काम करण्याचा आणि कोणतेही ‘जादा काम’ न करण्याचा निर्णय समस्त मोटरमन संघटनानी घेतला आहे. मध्य रेल्वेकडे लोकल फेऱ्या चालवण्यासाठी पुरेसे मोटरमन नाहीत. त्यामुळे मोटरमनला जादा काम करून, फेऱ्या चालवाव्या लागतात.

त्यामुळे आता सोमवारी लोकल सेवा कोलमडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. लोकल फेऱ्यांवर परिणाम होऊन त्याचा फटका प्रवाशांना बसण्याची शक्यता आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com