खासदार अमोल कोल्हे यांचा मालिका विश्वातून पुढील पाच वर्षांसाठी ब्रेक

खासदार अमोल कोल्हे यांचा मालिका विश्वातून पुढील पाच वर्षांसाठी ब्रेक

लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar

लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. यातच आता अमोल कोल्हे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. अमोल कोल्हे म्हणाले की, शिरूर लोकसभा मतदारसंघातील अनेक विषय आपण मार्गी लावले आहेत. अवघ्या पाच वर्षात अनेक प्रकल्प या ठिकाणी मार्गी लागले आहेत.

हे प्रत्यक्षात येण्याच्या दृष्टीने वेळ देणं गरजेचं आहे. त्यामुळे मालिका विश्वात काम करताना एवढा वेळ देणं शक्य नाही. मालिका विश्वातून अभिनयाला पाच वर्ष ब्रेक द्यावा लागणार आहे. अनेक चाहत्यांची यामध्ये निराशा होऊ शकते. परुंतु ज्या शिरुर लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप जनतेनं हा विश्वास माझ्यावर दाखवण्याचं ठरवलेलं दिसतंय त्यादृष्टीने याबाबत निर्णय हा घ्यावा लागेल. असं खासदार अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com