शिंदे गटाचे 16 आमदार अपात्र होणार; अनिल देसाई यांचं मोठं विधान
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सध्या सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु आहे. 16 आमदार अपात्र होणार कि नाही हा आहे. यावरुन युक्तीवाद सुरु आहे. यावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांनी मोठं विधान केलं आहे.
एका माध्यमाशी बोलताना अनिल देसाई म्हणाले की, 16 आमदार अपात्र करण्याचा निर्णय आधी होणे अपेक्षित आहे. शिंदे गटाचे वकील हरिश साळवे यांनी मांडलेला मुद्दा हा त्यांनी त्यांच्या हिशोबाने मांडला आहे. 16 अपात्र झाले तरी फरक पडत नाही. शिंदे गटाच्या आमदारांच्या कृती या पक्षविरोधी कारवाया असल्याचं सरळसरळ स्पष्ट होतं आहे. त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई झालीच पाहिजे. जर ती झाली नाही तर मग बाकीच्या घटना एकत्रित करुन दाखवता येणार नाहीत. आमचा कोर्टावर विश्वास आहे. त्यामुळं या कायद्याची अंमलबजावणी होणार आणि १६ आमदार अपात्र ठरणार असे अनिल देसाई यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावर सुप्रीम कोर्टात आज सलग तिसऱ्या दिवशी सुनावणी होत आहे. बुधवारच्या सुनावणीत शिंदे गटाचे वकील हरिश साळवे, नीरज किशन कौल यांनी युक्तिवाद मांडला. हे प्रकरण 7 न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे सोपवावं की नाही याबाबत कोर्ट निर्णय घेणार आहे. कोर्टाच्या या निर्णयाकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.