Girish Bapat Passed Away : भाजपा खासदार गिरीश बापट यांचे निधन
Admin

Girish Bapat Passed Away : भाजपा खासदार गिरीश बापट यांचे निधन

खासदार गिरीश बापट यांचे निधन झाले आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

खासदार गिरीश बापट यांचे निधन झाले आहे. वयाच्या 72 व्यावर्षी घेतला अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची माहिती भाजपा शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी दिली. त्यांचे दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांचे निधन झाले.  अंत्यविधी संध्याकाळी 7  वाजता वैकुंठ स्मशान भूमीत होणार आहे. 1973 पासून ते राजकारणात सक्रिय होते. 2019 ला पुण्याचे खासदार म्हणून निवडून आले.

सलग तीनवेळा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. 1995 पासून कसबा पेठ मतदारसंघात सलग पाचवेळा आमदार म्हणून विजयी झाले होते. टेल्को कंपनीत 1973 ला कर्मचारी म्हणून काम करत असताना कामगार संघटनेच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केला होता. 1983 ला पुणे महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले.

महिन्यांपूर्वी कसबा पोटनिवणुकीसाठी ऑक्सिजन लावून आणि व्हिलचेअरवर भाजपच्या मेळाव्यासाठी पोहचले होते. दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे पोटनिवडणुक झाली. या निवडणुकीत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. कसबा मतदार संघात आणि इतर पुण्यात भाजप पक्ष वाढवण्यासाठी त्यांचे मोठे योगदान होते.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com