MP Imtiyaz Jaleel
MP Imtiyaz Jaleel

Imtiyaz Jaleel: आजपासून खासदार इम्तियाज जलील बेमुदत उपोषणावर

अनेक दिवसांपासून औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहराच्या नामांतराचा प्रश्न केंद्र सरकारकडे प्रलंबित होता.

अनेक दिवसांपासून औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहराच्या नामांतराचा प्रश्न केंद्र सरकारकडे प्रलंबित होता. त्यानंतर केंद्र सरकारने या दोन्ही शहरांच्या नामांतराला मंजुरी दिली आहे. मात्र या निर्णयानंतर राजकारण चांगलेच तापले आहे.

याच पार्श्वभूमीवर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील हे आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्यासमोर बेमुदत उपोषणाला बसणार आहेत. औरंगाबाद नामांतर कृती विरोधी समितीच्या अंतर्गत हे उपोषण केले जाणार असल्याची माहिती इम्तियाज जलील यांनी दिली आहे.

दरम्यान छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज दुपारी तीन वाजेपासून बेमुदत उपोषणाला सुरुवात होणार आहे. यावेळी खासदार इम्तियाज जलील यांच्यासह एमआयएमचे अनेक नेते देखील उपस्थित राहणार आहेत. दोन्ही जिल्ह्यांचे नाव बदलण्यात आले आहे. मात्र याच निर्णयाला एमआयएमने विरोध केला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com