MP Raghav Chadha Suspended: राघव चढ्ढा राज्यसभेतून निलंबित, बनावट स्वाक्षरी प्रकरणी कारवाई
आम आदमी पक्षाचे खासदार राघव चढ्ढा यांना राज्यसभेतून निलंबित करण्यात आले आहे. बनावट स्वाक्षरी प्रकरणी राघव चढ्ढा यांना राज्यसभेतून निलंबित करण्यात आले आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
आम आदमी पक्षाचे खासदार राघव चढ्ढा यांना राज्यसभेतून निलंबित करण्यात आले आहे. कारण पाच खासदारांचा असा दावा आहे की, दिल्ली सेवा विधेयक त्यांच्या संमतीशिवाय निवड समितीकडे पाठवण्याच्या प्रस्तावावर त्यांच्या नावांचा उल्लेख करण्यात आला होता. आपचे खासदार राघव चढ्ढा यांनी हा प्रस्ताव मांडला होता. निषेध नोंदवणाऱ्यांमध्ये भाजपचे तीन, बीजेडी आणि अण्णाद्रमुकचे एक खासदार आहेत.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती. हा वाद चव्हाट्यावर येताच राज्यसभेच्या उपसभापतींनी याची चौकशी केली जाईल, असे आश्वासन दिले.
आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार राघव चढ्ढा यांनी आपल्यावर लावण्यात आलेले आरोप खोटे असल्याचं सांगितलं आहे. विशेषाधिकार समितीनं पाठवलेल्या नोटीसला उत्तर देऊ, असं राघव चढ्ढा यांनी सांगितलं होतं. खासदार म्हणून आपली प्रतिमा खराब करणाऱ्या भाजपच्या डावपेचांचा मी पर्दाफाश करणार असल्याचंही राघव चढ्ढा म्हणाले.