भाजपाच्या प्रदेश कार्यकारणीतून खासदार रक्षा खडसे बाहेर

भाजपाच्या प्रदेश कार्यकारणीतून खासदार रक्षा खडसे बाहेर

भाजप प्रदेश कार्यकारणीतून रक्षा खडसेंची नाव वगळल्याने राजकीय वर्तुळात रंगली चर्चा

मंगेश जोशी - जळगाव

भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नवीन प्रदेश कार्यकारणी जाहीर केली असून या प्रदेश कार्यकारणीतून मात्र खासदार रक्षा खडसे यांचे नाव वगळल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना मात्र उधाण आले आहे. खासदार रक्षा खडसे ह्या एकनाथ खडसे यांच्या सून असून एकनाथ खडसेंच्या पक्षांतरानंतर रक्षा खडसे यांनी भाजपमध्येच राहण्याचा निर्णय घेतला होता.

तसेच रक्षा खडसे ह्या प्रदेश कार्यकारणीत प्रदेश सरचिटणीस पदी होत्या. मात्र नव्याने निवड करण्यात आलेल्या प्रदेश कार्यकारणीतून रक्षा खडसे यांचे नाव वगळण्यात आले असून त्यांच्या जागी प्रदेश कार्यकारणी भुसावळचे माजी नगरसेवक अजय भोळे यांची प्रदेश सरचिटणीस पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. तर विधान परिषदेच्या माजी आमदार स्मिता वाघ यांना देखील प्रदेश कार्यकारणीत स्थान मिळाले असून प्रदेश उपाध्यक्षपदी स्मिता वाघ यांची निवड करण्यात आली आहे.

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष कार्यकारणीत मोठे फेरबदल करण्यात आले असून प्रदेश कार्यकारणीतून मात्र रक्षा खडसेंचे नाव वगळल्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढविले जात आहे. पक्षाकडून एक व्यक्ती एक पद हे धोरण राबविण्यात येत असल्याने कार्यकारणीत फेरबदल करण्यात आल्याची माहिती भाजपच्या सूत्रांकडून देण्यात आली असून लवकरच नवीन जिल्हाध्यक्षांची ही नियुक्ती केली जाणार असल्याची माहिती आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com