Ganpat gaikwad
Ganpat gaikwadTeam Lokshahi

खासदार श्रीकांत शिंदे आणि मी फुल विकास करणार, भाजप आमदार गणपत गायकवाड यांचे विधान

कल्याण पूर्व येथे प्रभाग कार्यालयासमोर आमदार आणि नागरिकांचे खुले चर्चासत्र
Published by :
Sagar Pradhan
Published on

अमजद खान| कल्याण : एकनाथ शिंदे यांची आम्हाला मदत करण्याची इच्छा होती ,मात्र उद्धव ठाकरे यांच्यामुळे ते आम्हाला मदत करू शकत नव्हते ,आता एकनाथ शिंदे आमच्या सोबत सत्तेत आले आहेत आता शिंदे फडणवीस सरकार आहे,शिंदे यांची काम करण्याची पद्धत आणि वेग सगळ्यांना माहित होतोय . म्हणूनच त्यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे आणि मी मिळून फुल स्पीड ने कल्याण पूर्वचा विकास करू असे विधान भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी केला आहे.आज कल्याण पूर्व येथील प्रभाग कार्यालयासमोर आमदार आणि नागरिकांचे खुले चर्चासत्र आयोजित करण्यात आलं होतं. या चर्चेदरम्यान त्यांनी नागरिकांच्या प्रश्नांना सडेतोड उत्तर दिले याच वेळे त्यांनी हे विधान केलं.

Ganpat gaikwad
महाराष्ट्राला फोकस्ड मुख्यमंत्र्याची गरज, सुप्रिया सुळेंचा शिंदे सरकारवर प्रहार

कल्याण पूर्व येथील एका सोशल मीडियाचा एका ग्रुप वर काही दिवसांपूर्वी काही समाजसेवक, माहिती अधिकार कार्यकर्ते यांनी आमदार गणपत गायकवाड यांची जोरदार चर्चा झाले होती. काही प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले होते. त्यानंतर आमदार गणपत गायकवाड यांनी नागरिकांसह या सामाजिक कार्यकर्त्यांना देखील खुले चर्चासत्र ठेवण्याचा आवाहन केलं. आज कल्याण पूर्वेतील ड प्रभागात या चर्चासत्राचा आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी या चर्चासत्रला नागरिकांसह सामाजिक कार्यकर्ते माहिती अधिकार कार्यकर्ते विनोद तिवारी व राजकीय कार्यकर्ते देखील उपस्थित होते.

Ganpat gaikwad
सांगली : साधूंच्या मारहाणी प्रकरणी अखेर गुन्हा दाखल, सहा जणांना अटक

यावेळी विकास किती झाला ,जे काम झाले नाही ते का नाही झाले. कोणते काम आमदारांचं असतं कोणतं काम नगरसेवकांचे असतं, कोणतं काम खासदारांचं आहे यावर संपूर्ण चर्चा झाली. नागरिकांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी भाजप आमदार गणपत गायकवाड यांना 25 प्रश्न विचारले या प्रश्नांना आमदार गणपत गायकवाड यांनी सडेतोड उत्तरे दिली.

यावेळी बोलताना आमदार गायकवाड यांनी नागरिकांना समजावून सांगितलं की कोणते काम त्यांच्या आहे कोणतं काम महापालिकेकडे आहे .यावेळी बोलताना नागरिकांसाठी मतदारांसाठी मी चोवीस तास उपलब्ध असतो म्हणूनच नागरिक माझ्याकडे प्रश्न घेऊन येतात आपले प्रश्न मांडतात , काही काम माझ्याकडे नसतात त्याबाबत देखील मलाच विचारणा केली जाते ठीक आहे मी लोकप्रतिनिधी आहे लोकांचं काम कसं होईल विकास कसा होईल याकडे माझं लक्ष आहे आणि पुढे पण काम कसं करता येईल याबाबत मी प्रयत्नशील असेल असे गणपत गायकवाड यांनी सांगितलं

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com