MPSC  उमेदवारांसाठी मोठी बातमी! MPSC परीक्षा पुढे ढकलली
MPSC उमेदवारांसाठी मोठी बातमी! MPSC परीक्षा पुढे ढकलली, नवीन वेळापत्रक जाहीर आताच पाहा...MPSC उमेदवारांसाठी मोठी बातमी! MPSC परीक्षा पुढे ढकलली, नवीन वेळापत्रक जाहीर आताच पाहा...

MPSC उमेदवारांसाठी मोठी बातमी! MPSC परीक्षा पुढे ढकलली, नवीन वेळापत्रक जाहीर आताच पाहा...

MPSC परीक्षा पुढे ढकलली: नवीन वेळापत्रक जाहीर, ताज्या तारखा जाणून घ्या...
Published by :
Riddhi Vanne
Published on

सप्टेंबर 2025 मध्ये महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती आणि अतिवृष्टीमुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षांची तारीख पुढे ढकलली गेली होती. विद्यार्थ्यांनी आणि राज्य सरकारने आयोगाकडे परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती, जी स्वीकारली गेली.

आता, या परीक्षा संदर्भात नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

नवीन परीक्षेच्या तारखा:

  • महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा-2025: 09 नोव्हेंबर, 2025 (रविवार)

  • महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2025: 21 डिसेंबर, 2025 (रविवार)

  • महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2025: 04 जानेवारी, 2026 (रविवार)

या परीक्षा राज्य सरकारच्या 380 पेक्षा जास्त पदांवर भरतीसाठी घेण्यात येणार आहेत. पूर आणि पावसामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर पोहोचण्यात अडचणी आल्याने या निर्णयाची गरज होती. ताज्या माहितीसाठी MPSC ची वेबसाइट तपासावी.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com