MPSC Student Protest : पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरुच

MPSC Student Protest : पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरुच

एमपीएससीच्या विद्यार्थी त्यांच्या मागण्या पूर्ण होत नसल्याने चांगलेच आक्रमक झाले आहेत.

एमपीएससीच्या विद्यार्थी त्यांच्या मागण्या पूर्ण होत नसल्याने चांगलेच आक्रमक झाले आहेत. पुण्यातल्या झाशीची राणी लक्ष्मीबाई चौकात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरुच आहे. नवी परीक्षा पद्धती 2025 पासून लागू करावी.

तसेच अभ्यास करण्यासाठी किमान 5 ते 6 महिने वेळ मिळावा.नवा अभ्यासक्रम यूपीएससीच्या अभ्यासक्रवार आधारित आहे. त्यामुळे पुस्तकं उपलब्ध नाहीत. त्यात सुधारणा करण्यात यावी या मागणीसाठी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरु आहे.

एमपीएससी विद्यार्थ्यांच्या मागणीसाठी एमपीएससीच्या संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याची माहिती जयंत पाटील यांनी विद्यार्थ्यांना दिली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com