18 तासानंतर एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे
Admin

18 तासानंतर एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे

न्यायालयात आणि सर्वोच्च न्यायालयात देखील एमपीएससीचे अधिकारी खोटे बोलतात.
Published by :
Siddhi Naringrekar

एमपीएसीचे विद्यार्थी राज्यभर आंदोलन सुरु होते. एमपीएसीने राज्यसेवा परीक्षेचा नवीन अभ्यासक्रम 2023 पासून लागू करण्याचा निर्णय घेतला. मात्र हा अभ्यासक्रम 2025 पासून लागू करावा अशी या विद्यार्थ्यांची मागणी आहे. एमपीएसीच्या राज्यसेवा परीक्षेच्या नवीन अभ्यासक्रमाला घेऊन हे आंदोलन केले सुरु होते.

तब्बल 18 तासानंतर पुण्यातलं एमपीएससीच आंदोलन स्थगित करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीच्या आश्वासनानंतर पुण्यातल्या अलका टॉकीज चौकातलं आंदोलन विद्यार्थ्यांकडून स्थगित करण्यात आलं.उद्या पाच विद्यार्थ्यांचे शिष्टमंडळ पुण्यात मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे. यावेळी हे विद्यार्थी मुख्यमंत्र्यांसमोर आपल्या मागण्या मांडणार आहेत. आंदोलन स्थगित म्हणजे स्वल्पविराम आहे. पूर्णविराम नाही, असा इशारा या विद्यार्थ्यांनी दिला आहे.

त्याची अखेर दखल घेण्यात आली आहे. तसेच या विद्यार्थ्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत भेट घडवून देण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांनी तूर्तास आंदोलन मागे घेतलं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com