MS Dhoni
MS Dhoni

MS धोनी आयपीएलचा पुढील हंगाम खेळणार का? सुरेश रैनानं दिलं भन्नाट उत्तर; पाहा VIDEO

संपूर्ण क्रिडाविश्वात नंबर वन कर्णधार म्हणून छाप टाकणारा एम एस धोनी यंदाच्या आयपीएल हंगामातही चौकार षटकारांचा पाऊस पाडत आहे.
Published by :

भारतीय क्रिकेट संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून एम एस धोनीचं नाव कोरलं गेलं आहे. संपूर्ण क्रिडाविश्वात नंबर वन कर्णधार म्हणून छाप टाकणारा एम एस धोनी यंदाच्या आयपीएल हंगामातही चौकार षटकारांचा पाऊस पाडत आहे. आंतरराष्ट्राय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर धोनी आयपीएलमध्ये निवृत्ती कधी घेणार, असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. परंतु, ४२ वर्षांचा धोनी अजूनही धडाकेबाज फलंदाजी करत असल्याचं यंदाच्या आयपीएल हंगामात पाहायला मिळत आहे. त्यामुळे धोनीच्या आयपीएलच्या निवृत्तीबाबत अनेक लोक संभ्रमात पडले आहेत. परंतु, सुरेश रैना आणि आर पी सिंगच्या एका व्हिडीओनं चाहत्यांना पडलेल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे.

चेन्नई सुपर किंग्जचा माजी कर्णधार एम एस धोनीनं आयपीएल २०२४ मध्ये धडाकेबाज फलंदाजी करुन चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे. यंदाचा आयपीएल हंगाम धोनीचा शेवटचा हंगाम असल्याचं बोललं जात आहे. परंतु, याचदरम्यान धोनीचा जवळचा मित्र आणि माजी क्रिकेटर सुरेश रैनानं धोनीच्या आयपीएल करिअरबाबत मोठा खुलासा केला आहे.

डावखुरा फलंदाज सुरेश रैना आयपीएलच्या या हंगामात हिंदी समालोचक म्हणून काम करत आहे. या निमित्ताने रैना त्याच्या माजी सहकाऱ्यांसोबत क्रिकेटशी संबंधित अनेक गोष्टींवर भाष्य करत असतो. जिओ सिनेमावर सुरु असलेल्या चर्चेत भारताचा माजी वेगवान गोलंदाज आर पी सिंग आणि सुरेश रैनाला एम एस धोनीच्या आयपीएल करिअरबाबत विचारण्यात आलं. धोनी आयपीएलचा पुढचा हंगाम खेळणार का? असा प्रश्न शो प्रेजेंटरने आर पी सिंग आणि रैनाला विचारला.

इथे पाहा व्हिडीओ

या प्रश्नाचं उत्तर देताना आर पी सिंग म्हणाला, धोनीचा हा शेवटचा हंगाम असेल असं वाटत नाही, तर रैनाने या प्रश्नाचं एका शब्दात उत्तर दिलं, तो म्हणाला धोनी खेळणार. १४ एप्रिलला मुंबई इंडियन्सविरोधात खेळताना धोनीनं वादळी खेळी केली होती. धोनीनं शेवटच्या षटकात हार्दिक पंड्याला सलग तीन षटकार ठोकले होते. धोनीने चार चेंडू खेळत २० धावा कुटल्या होत्या.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com