ST Ticket Price Hike : मोठी बातमी! दिवाळीत गावी जाणे महागले
ST Ticket Price Hike : मोठी बातमी! दिवाळीत गावी जाणे महागले; ST महामंडळाकडून इतक्याची भाडेवाढST Ticket Price Hike : मोठी बातमी! दिवाळीत गावी जाणे महागले; ST महामंडळाकडून इतक्याची भाडेवाढ

ST Ticket Price Hike : मोठी बातमी! दिवाळीत गावी जाणे महागले; ST महामंडळाकडून इतक्याची भाडेवाढ

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) दिवाळीसाठी हंगामी 10 टक्के भाडेवाढ लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
Published by :
Riddhi Vanne
Published on

ST Ticket Price Hike : दिवाळीच्या तोंडावर सर्वसामान्य प्रवाशांना मोठा झटका बसला आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) दिवाळीसाठी हंगामी भाडेवाढ लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, वातानुकूलित शिवनेरी आणि शिवाई बसेस वगळता सर्वच प्रकारच्या बसेससाठी 10 टक्के दरवाढ करण्यात येणार आहे. एसटी महामंडळाच्या या भाडेवाढीमुळे गावी जाणाऱ्या लाखो प्रवाशांच्या खिशाला यंदाही झळ बसणार आहे. प्रवाशांसाठी हा प्रवास आता अधिक महागडा होणार आहे.

कधीपासून लागू होणार दरवाढ?

एसटी महामंडळाने घेतलेला हा भाडेवाढीचा निर्णय 15 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर या कालावधीत लागू असणार आहे. दिवाळी सणामध्ये मोठ्या संख्येने लोक एसटी बसने प्रवास करत असल्याने, महामंडळाने नेमक्या याच काळात दरवाढ लागू केली आहे.

कोणत्या बसेससाठी दरवाढ?

वातानुकूलित शिवनेरी आणि शिवाई बसेस वगळता, गाव-खेड्यांपासून ते लांब पल्ल्याच्या रातराणीसह सर्वसाधारण बसेससाठी ही 10 टक्के दरवाढ लागू होईल. एसटीचा प्रवास आजही सुरक्षित मानला जात असला तरी, या दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या "लाल परीचा" प्रवास महागणार आहे.

गतवर्षीही झाली होती भाडेवाढ

गेल्या वर्षीही राज्य परिवहन प्राधिकरणाच्या (STA) बैठकीत भाडेवाढीच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली होती. त्यावेळी 14.95 टक्के तिकीट दरवाढ झाली होती आणि ती 24 जानेवारी 2025 पासून लागू करण्यात आली होती. त्यामुळे, नव्या वर्षातही एसटीचा प्रवास महागला होता. आता पुन्हा दिवाळीच्या निमित्ताने 10% हंगामी दरवाढ लागू होत असल्याने, गावी जाण्यासाठी प्रवाशांना जादा पैसे मोजावे लागणार आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com