Google च्या पिचाईंना मागं टाकत BGI रँकिंगमध्ये अंबानी दुसऱ्या क्रमांकावर

Google च्या पिचाईंना मागं टाकत BGI रँकिंगमध्ये अंबानी दुसऱ्या क्रमांकावर

मुकेश अंबानी भारतात पहिल्या आणि जगात दुसऱ्या क्रमांकावर आले आहेत.

मुकेश अंबानी भारतात पहिल्या आणि जगात दुसऱ्या क्रमांकावर आले आहेत. त्यांनी ब्रँड गार्डियनशिप इंडेक्स 2023 मध्ये मायक्रोसॉफ्टचे सत्या नाडेला आणि Google चे सुंदर पिचाई यांना मागं टाकलं आहे.

ब्रँड फायनान्सच्या ब्रँड गार्डियनशिप इंडेक्स (BGI) 2023 मध्ये Nvidia चे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) जेन्सेन हुआंग प्रथम आणि रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे ​​मुकेश अंबानी दुसऱ्या स्थानावर आले आहेत.

गेल्या वर्षीचा टॉपर मायक्रोसॉफ्टचा सत्या नाडेला तिस-या क्रमांकावर आला आहे. निर्देशांकातील टॉप 10 लोकांपैकी बहुतांश भारतीय किंवा भारतीय वंशाचे आहेत. Adobe चे शंतनू नारायण चौथ्या तर सुंदर पिचाई पाचव्या स्थानावर आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com