मुकेश अंबानी झाले आजोबा: मुलगी ईशाने दिला जुळ्या मुलांना जन्म

मुकेश अंबानी झाले आजोबा: मुलगी ईशाने दिला जुळ्या मुलांना जन्म

रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी हिने शनिवारी जुळ्या मुलांना जन्म दिला आहे.
Published by  :
shweta walge

रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी हिने शनिवारी जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. ईशाच्या मुलीचे नाव आदिया आणि मुलाचे नाव कृष्ण आहे. अंबानी कुटुंबीयांनी रविवारी दुपारी प्रसारमाध्यमातून ही माहिती दिली.

ईशा अंबानीने 4 वर्षांपूर्वी उद्योगपती आनंद पिरामलसोबत लग्न केले होते. ईशा अंबानी सध्या रिलायन्स रिटेलचा व्यवसाय सांभाळते.

मुकेश अंबानी यांच्या कुटुंबात आता तीन लहान मुले आहेत. त्यांचा जावई आकाश आणि श्र्लोक यांना पृथ्वी नावाचा मुलगा आहे. मुकेश अंबानी हे त्यांच्या नातवासोबत अनेकदा दिसले आहेत. खालील ग्राफिकमध्ये अंबानी कुटुंब समजू शकते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com