Mumbai 1 Card : मुंबईकरांचा प्रवास होणार सोपा, 'मुंबई 1' कार्ड होणार लाँच

सार्वजनिक वाहतुकीसाठी सिंगल कार्ड 'मुंबई 1' लवकरच लाँच केले जाईल
Published by :
Shamal Sawant

मुंबई महानगरमध्ये सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करण्यासाठी, फक्त एक कार्ड दाखवावे लागेल आणि मुंबईकर कुठेही सहज प्रवास करू शकतील अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. सार्वजनिक वाहतुकीसाठी सिंगल कार्ड 'मुंबई 1' लवकरच लाँच केले जाईल. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासोबत संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सांगितले की, हे सिंगल कार्ड मेट्रो, मोनो रेल, उपनगरीय लोकल ट्रेन आणि सार्वजनिक वाहतूक बसेसमध्ये प्रवास करण्यासाठी वापरले जाऊ शकते.

हे कार्ड एका महिन्यात तयार होईल. त्याचवेळी, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, महाराष्ट्रात 1 लाख 73 हजार 804 कोटी रुपयांचे रेल्वेचे काम सुरू आहे आणि यावर्षी 23 हजार 778 कोटी रुपयांच्या नवीन कामांनाही मंजुरी देण्यात आली आहे. रेल्वेमंत्र्यांनी सांगितले की, शहरात 17 हजार कोटी रुपयांचे प्रकल्प सुरू आहेत आणि यामुळे देशाच्या आर्थिक राजधानीतील रेल्वे नेटवर्कमध्ये परिवर्तन होईल.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com