मुंबई अपघात; कारची डिव्हायडर तोडून दुसऱ्या बाजूनं जाणाऱ्या कारला धडक

मुंबई अपघात; कारची डिव्हायडर तोडून दुसऱ्या बाजूनं जाणाऱ्या कारला धडक

मुंबईतील विक्रोळीत भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

मुंबईतील विक्रोळीत भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. एक स्विफ्ट डिझायर गाडी मुंबईहून ठाण्याकडे जात होती. दुसऱ्या बाजूनं एक रेंज रोव्हर डिस्कव्हरी ठाण्याहून मुंबईच्या दिशेनं जात होती. त्याच दरम्यान स्विफ्ट डिझायरनं दुभाजक तोडून पुलाच्या पलिकडून जाणार्‍या रेंज रोव्हर डिस्कवरीला धडक दिली. यामुळेच अपघात झाला.

त्यात बसलेले 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. घटनास्थळी उपस्थित लोकांनी पोलिसांच्या मदतीनं तिनही जखमींना रुग्णालयात दाखल केलं आहे. सध्या विक्रोळी पोलीस अपघाताच्या कारणाचा तपास करत आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com