मुंबई अडकली प्रदूषणाच्या विळख्यात; हवा दिल्लीपेक्षाही खराब

मुंबई अडकली प्रदूषणाच्या विळख्यात; हवा दिल्लीपेक्षाही खराब

मुंबईतील हवा गुणवत्ता खालवत चालल्याने अनेकांना आरोग्याच्या समस्यांचा तोंड द्यावं लागत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

मुंबईतील हवा गुणवत्ता खालवत चालल्याने अनेकांना आरोग्याच्या समस्यांचा तोंड द्यावं लागत आहे. मुंबईत अनेक रुग्णांमध्ये सर्दी, खोकला, घसा खवखवणे या सारख्या समस्या वाढल्या आहेत. मुंबईतील हवा गुणवत्ता निर्देशांक दिल्लीपेक्षाही खराब स्थितीत आहे.

मुंबईतील हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक 300 पार गेला आहे. मुंबईचा हवा गुणवत्ता निर्देशांक 319 नोंदवण्यात आलेला आहे. मुंबईतील हवा गुणवत्ता निर्देशांक 319 वर गेला आहे. म्हणजे अतिधोकादायक श्रेणीत मुंबईची नोंद झाली आहे. तर दिल्लीतील हवा गुणवत्ता निर्देशांक 308 वर आहे. या प्रदूषणाच्या अनेकांना आरोग्यासंबंधी समस्या निर्माण झाल्या आहेत.

हवेची गुणवत्ता खालावल्याने नागरिकांना डोळ्यात जळजळ, डोळे पाणावणे, कोरडेपणा, ऍलर्जी, सूज, लालसरपणा, साथीचे आजार आणि श्वासोच्छवासाच्या संसर्गाबरोबरच नागरिकांना त्यांच्या इत्यादींचा सामना करावा लागतो आहे. अशा परिस्थितीत कोरड्या डोळ्यांच्या आजाराच्या घटनांमध्ये वाढ पाहत आहोत. डॉक्टरांनी लोकांना कामासाठी बाहेर पडताना मास्क घालण्याचा सल्ला दिला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com