रेल्वे क्रॉसिंग गेट तोडून भरधाव ट्रक थेट रेल्वे रुळावर; जळगावमध्ये मुंबई-अमरावती एक्सप्रेसचा अपघात

मुंबई-अमरावती एक्सप्रेसचा अपघात झाला आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

मुंबई-अमरावती एक्सप्रेसचा अपघात झाला आहे. भरधाव ट्रक थेट ट्रॅकवर आल्यामुळे जळगावमध्ये मुंबई-अमरावती एक्सप्रेस ट्रेनचा अपघात झालाय. बोदवड रेल्वे स्थानकावर पहाटे 4 वाजता ही घटना घडली. रेल्वेचा वेग कमी असल्यानं मोठा अनर्थ टळला.

या अपघातामुळे मुंबई- हावडा मार्गावरील अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाला असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com