BEST Strike : मुंबईकरांचे हाल; 'बेस्ट' कर्मचाऱ्यांचा संप सुरुच

BEST Strike : मुंबईकरांचे हाल; 'बेस्ट' कर्मचाऱ्यांचा संप सुरुच

मुंबईत बेस्टमधील कंत्राटी कामगारांचा संप सुरूच आहे.
Published by  :
Siddhi Naringrekar

मुंबईत बेस्टमधील कंत्राटी कामगारांचा संप सुरूच आहे. पगारवाढ आणि बेस्टच्या सुविधा अशा विविध सुविधांची मागणी हे कंत्राटी कर्मचारी मागणी करत होते.नऊ हजार कंत्राटी कर्मचारी बेस्टच्या बसचे वाहक आणि चालक असल्याने याचा मोठा फटका बेस्टला आणि मुंबईकरांना बसत आहे.

बेस्ट कर्मचाऱ्यांचा मागच्या पाच दिवसापासून विविध मागण्यासाठी संप सुरू आहे. यामध्ये प्रामुख्याने कंत्राटी कर्मचारी संपावर गेलेले आहेत. त्यामुळे मुंबईकरांना प्रवासासाठी अडचण निर्माण होत आहे.

प्रामुख्याने या कर्मचाऱ्यांची ही मागणी आहे की बेस्ट उपक्रमामध्ये सामावून घ्या. त्यामुळे समान काम समान वेतन ही परंपरा लागू होईल. मागच्या तीन वर्षापासून यासंदर्भात आम्ही मुंबई प्रशासनाकडे या संदर्भात निवेदन दिले आहेत मात्र कुठलीही दखल घेतली नाही. असे त्यांचे म्हणणे आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com