ताज्या बातम्या
Special Report | Mumbai BMC | कचरा करताना, थुंकताना सावधान! घाण कराल, दंड भराल
मुंबई महापालिकेने कचरा आणि थुंकण्याच्या विरोधात धडक मोहीम सुरू केलीय. क्लीन अप मार्शल्सनी 11 महिन्यात 4 कोटी 54 लाखांचा दंड वसूल केला. मुंबई स्वच्छ ठेवण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावं.
मुंबईत अनेक ठिकाणी कचऱ्याचं साम्राज्य दिसतं. तर काही ठिकाणी पान, गुटखा खावून थुंकणाऱ्यांचंही प्रमाण वाढलंय. म्हणूनच मुंबई महापालिकेने त्याविरोधात धडक मोहीम सुरू केलीय. त्यासाठी मुंबईत क्लीन अप मार्शलची नेमणूक करण्यात आलीय. या क्लीन अप मार्शल्सनी गेल्या 11 महिन्यात 4 कोटी 54 लाखांचा दंड वसूल केलाय.
क्लीन अप मार्शल मुंबई घाण करणाऱ्यांवर धडक कारवाई करतायत. त्यामुळे मुंबईकरांनो, कारवाई होऊ नये म्हणून काळजी घ्याच, पण आपली मुंबई स्वच्छ राहावी यासाठी तुमचं योगदानही अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण देशाची आर्थिक राजधानी असलेली आपली मुंबापुरी घाणेरडी असणं, हे आपल्याला शोभणारं नक्कीच नाही.