मुंबई बोट अपघात: चौकशीसाठी समिती स्थापन केली जाणार

मुंबई बोट अपघात: चौकशीसाठी समिती स्थापन केली जाणार

मुंबईत गेटवे ऑफ इंडिया एलिफंटाकडे जाणारी नीलकमल नावाची बोट उलटून मोठी दुर्घटना घडली
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात

  • मुंबईत गेटवे ऑफ इंडिया एलिफंटाकडे जाणारी नीलकमल नावाची बोट उलटून मोठी दुर्घटना घडली

  • बोट अपघाताच्या चौकशीसाठी समिती स्थापन केली जाणार

  • समिती स्थापन करण्याबाबत नौदलाच्यावतीने माहिती

मुंबईत गेटवे ऑफ इंडिया एलिफंटाकडे जाणारी नीलकमल नावाची बोट उलटून मोठी दुर्घटना घडली या दुर्घटनेत 14 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. या अपघाताचा एक धडकी भरवणारा व्हिडीओ समोर आला. नौदलाची बोट धडकल्याने प्रवासी बोटीचे दोन तुकडे झाले.

याच पार्श्वभूमीवर आता बोट अपघाताची चौकशी करण्यात येणार असून, यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. अशी माहिती नौदलाच्या वतीने देण्यात आली. दरम्यान, नौदलाच्या बोटीवरील सहापैकी चार जणांचा मृत्यू झाला असून, नौदलाच्या दोन कर्मचाऱ्यांपैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे नौदलाने सांगितले.

अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी उपाययोजना सुचविण्यासाठी विधान परिषदेच्या 5 ते 7 आमदारांची एक समिती गठित करण्यात येईल, अशी माहिती विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोन्हे यांनी विधान परिषदेत दिली.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com