मध्य रेल्वे मार्गावरील लोकल ट्रेनमध्ये प्रवाशांवर चाकूने हल्ला, आरोपी ताब्यात, नक्की काय झालं?
मुंबईमध्ये लाखो लोक लोकल ट्रेनने प्रवास करतात. मध्य, हार्बर आणि पश्चिम लोकल मार्गांवर मोठ्या संख्येने लोक कामासाठी लोकल ट्रेनचा वापर करतात. मात्र या प्रवासादरम्यान अनेक घटनादेखील घडताना दिसतात. मध्य रेल्वे मार्गावरुण प्रवास करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दीदेखील होते. या गर्दीमध्ये अनेक वेळा धक्काबुक्कीसारखे प्रसंग घडतात. मात्र अशातच एक अशी घटना समोर आली आहे ज्यामुळे सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे. एका इसमाने सोबत असलेल्या प्रवाशांवर चाकूने हल्ला केला आहे.
याप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, कल्याणहूं दादरला जाणाऱ्या जलद लोकलमध्ये अवघ्या 19 वर्षीय मुलाने हे कृत्य केले आहे. या आरोपीने मुंब्रा या स्थानकावर उतरण्यास मिळालं नाही. ही लोकल जलद असल्याने ती मुंब्रा येथे थांबणार नाही असं सहप्रवाशांनी सांगितले. मात्र हुसेन शेखने उतरण्याचा प्रयत्न करत असताना एका प्रवाशाचा त्याला धक्का लागला. त्यावरून वाद सुरु झाला. या रागामध्ये त्याने तेथील 3 प्रवाशांवर चाकूने हल्ला केला. यामध्ये प्रवासी जखमी झाल्याचे वृत्त हाती आले आहे.