Mumbai Coastal Road : कोस्टल रोड आणि वांद्रे सी लिंकला जोडणारा रस्ता आजपासून खुला

कोस्टल रोड आणि वांद्रे सी लिंक जोडणारा रस्ता मुंबईकरांसाठी खुला. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण. प्रदूषण कमी, प्रवास सोपा.
Published by :
Team Lokshahi

कोस्टल रोड आणि वांद्रे सी लिंकला जोडणारा रस्ता आजपासून खुला करण्यात आला आहे. मुख्यमंत्री 'देवेंद्र फडणवीस' यांच्या हस्ते काल म्हणजेच २६ जानेवारीला या पुलाचे लोकार्पण झाले आहे. 'स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज कोस्टल रोड' आणि 'वरळी वांद्रे सी लिंक'ला जोडणाऱ्या मार्गिकचे लोकार्पण काल पार पडले आहे.

सी लिंकला जोडणारा आणि कोस्टलरोडला जोडला जाणारा पुल, आजपासून सामान्य मुंबईकरांच्या वाहतुकीसाठी सुरू झाला आहे. वांद्रे ते मरीन ड्राईव्ह हा प्रवास पहिला एक ते दीड तासांचा होता, परंतु तो आता मुंबईकरांसाठी अवघ्या १२ ते १५ मिनिटांचा असणार आहे. या कोस्टल रोडमुळे वेळेची बचत आणि इंधनाची बचत होणार असूनच प्रदूषणदेखील कमी होणार आहे.

आज सकाळपासूनच मुंबईकरांची कोस्टल रोडवर रेलचेल पाहायला मिळत आहे. तसेच वरळी, प्रभादेवी, लोअर परळ आदी भागातील प्रवाशांसाठी देखील तीन आंतरमार्गिका खुल्या होणार आहेत. तसेच कोस्टल रोड दररोज सकाळी ७ ते मध्यरात्री १२ वाजेपर्यंत खुला राहणार आहे.

एकनाथ शिंदे यांच्या काळात 2 टप्प्यांचं लोकार्पण झाले होते. या कोस्टल रोडसाठी मुंबईकरांना सात वर्ष वाट पाहावी लागली होती. पाचव्या टप्प्यात कोस्टल रोड संपूर्ण क्षमतेने प्रवाशांसाठी आजपासून खुला करण्यात आला आहे. यासोबतच, वरळी, प्रभादेवी, लोअर परळ, लोटस जंक्शन इत्यादी भागातील प्रवाशांसाठी तीन इंटरसिटी मार्ग देखील खुले झाले आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com