Amol Kale Death
Amol Kale Death

Amol Kale Death: क्रिकेटविश्वात शोककळा! मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांचं अमेरिकेत निधन

क्रिकेटविश्वातून एक दुख:द बातमी समोर आलीय. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांचं अमेरिकेत हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं.
Published by :

MCA President Amol Kale Died : क्रिकेटविश्वातून एक दुख:द बातमी समोर आलीय. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांचं अमेरिकेत हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. अमोल कऱ्हाडकर यांनी सोशल मीडियावर याबाबत माहिती दिलीय. अमेरिकेत टी-२० वर्ल्डकपचे पहिल्या फेरीतील सामने सुरु आहेत. रविवारी भारत-पाकिस्तान सामना न्ययॉर्कमध्ये रंगला होता. हा सामना पाहण्यासाठी अमोल काळे न्यूयॉर्कमध्ये गेले होते. परंतु, सोमवारी त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांची प्राणज्योत मालवली.

काळे यांच्या निधनानं संपूर्ण क्रीडाविश्वात शोककळा पसरली आहे. क्रिकेटप्रेमींसह दिग्गज व्यक्ती काळे यांच्या निधनानं शोकाकूल झाले आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून काळे यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही काळे यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. आव्हाड ट्वीटरवर म्हणाले, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांच्या निधनाचं वृत्त ऐकून दु:ख झालं. ते एक चांगले आयोजक आणि क्रिकेटचे चाहते होते. अमोल जगाचा निरोप घेण्याचं तुझं वय नव्हतं. माझ्यासाठी हा वैयक्तीक नुकसान आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com