Sanjay Raut
Sanjay Raut

मुंबई गुन्हे शाखेची संजय राऊतांना नोटीस

मुंबई गुन्हे शाखेची संजय राऊतांना नोटीस.मुख्यमंत्री कार्यालयातून तुरुंगातील गुंडांना फोन जात असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता.
Published by :
shweta walge
Published on

मुंबई गुन्हे शाखेने राऊतांना नोटीस धाडली असून मुख्यमंत्री कार्यालयाबाबत केलेल्या विधानाप्रकरणी उत्तर मागितलं आहे. मुख्यमंत्री कार्यालयातून तुरुंगातील गुंडांना फोन जात असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. त्याबाबत पोलीसांनी त्यांना नोटीस बजावली असून आरोपांची पडताळणी करण्यात येणार असल्याचं पोलिसांनी म्हटलंय. यासंदर्भातील पुरावे मागण्यासाठी आणि काही माहिती असल्यास ती क्राईम ब्रँच कडे सोपविण्या संदर्भात ही नोटीस पाठविण्यात आल्याचं पोलिसांनी म्हटलंय.

मुख्यमंत्री कार्यालयातून तुरुंगातील गुंडांना फोन जात आहेत, असं विधान संजय राऊतांनी केलं होतं. त्या विधानानंतर आज राऊतांना मुंबई गुन्हे शाखेने नोटीस पाठवली असून पोलिस त्यांनी केलेल्या आरोपांची पडताळणी करणार आहेत. या प्रकरणात राऊतांचा जबाब नोंदवला जावू शकतो.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com