मुंबईकर नोकरदारांना 'हे' सहा दिवस घरचा डब्बा मिळणार नाही; मुंबईचे डबेवाले सुट्टीवर जाणार
Admin

मुंबईकर नोकरदारांना 'हे' सहा दिवस घरचा डब्बा मिळणार नाही; मुंबईचे डबेवाले सुट्टीवर जाणार

मुंबईतल्या नोकरदारांना दुपारचं जेवण हे मुंबईचे डबेवाले पुरवतात.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

मुंबईतल्या नोकरदारांना दुपारचं जेवण हे मुंबईचे डबेवाले पुरवतात. लाखो मुंबईकरांना हे डबेवाले वेळेत जेवण पुरवतात. आता मात्र हे मंबईचे डबेवाले सहा दिवसांच्या रजेवर जाणार आहे. येत्या 3 ते 8 एप्रिल या कालावधीत डबेवाल्यांची सेवा बंद असणार आहे.

घरचे ताज जेवणे दुपारी मुंबईकरांना पोहचविणारे मुंबईचे डबेवाले हे महत्वाचे काम करत असतात. आता मात्र मुंबईतल्या नोकरदारांची या सहा दिवसांच्या कालावधीत गैरसोय होणार आहे. हे डबेवाले आपापल्या गावातील यात्रांमध्ये सहभागी होण्यासाठी जाणार आहेत.

अनेक समस्यांतून मार्ग काढत हे डबेवाले ग्राहकांपर्यंत जेवण पोहोचवण्याचे कठीण काम करत असतात. आता हे डबेवाले 3 ते 8 एप्रिल असे सलग पाच दिवस सुटीवर गेले आहेत. मात्र या काळात पैसे न कापण्याची विनंती देखील मुंबई डबेवाला असोसिएशनने केली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com