मुंबईकरांना बसणार वीज दरवाढीचा झटका; बेस्टकडून 18 टक्के वीज दरवाढीचा प्रस्ताव

मुंबईकरांना बसणार वीज दरवाढीचा झटका; बेस्टकडून 18 टक्के वीज दरवाढीचा प्रस्ताव

मुंबईकरांना लवकरच वीजदरवाढीचा झटका बसणार आहे.

मुंबईकरांना लवकरच वीजदरवाढीचा झटका बसणार आहे. अदानी इलेक्ट्रिसिटी व टाटा पॉवरनंतर आता बेस्टनेही वीजदरवाढीचा प्रस्ताव महाराष्ट्र वीज नियामक मंडळाकडे पाठवला आहे. बेस्टने 18 टक्के वीजदरवाढ करण्याचा निर्णय घेतला असून तसा प्रस्ताव महाराष्ट्र वीज नियामक आयोगाकडे पाठवण्यात आला आहे.

बेस्टने १८ टक्क्यांपर्यंत वीज दरवाढीचा प्रस्ताव सादर केल्याने मुंबईकरांच्या वीज बिलामध्ये १८ टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. यामध्ये घरगुती ग्राहकांसाठी १०० युनिट पर्यंत १८ टक्के दरवाढीचा प्रस्ताव असून १०१ ते ३०० युनिट पर्यंत ६ टक्केपर्यंत दरवाढीचा प्रस्ताव आहे. त्याचबरोबर ३०१ ते ५०० व त्याच्या पुढे दोन टक्के वीज दरवाढीची शक्यता आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या महागाईने कंबरडे मोडणाऱ्या मुंबईकरांना लवकरच वीजदरवाढीचा झटका बसणार आहे. मुंबईसाठी वीज पुरवठा करणाऱ्या अदानी इलेक्ट्रिसिटी आणि टाटा पॉवरने वीजदरवाढीचा प्रस्ताव दिल्यानंतर आता बेस्टनेही वाढत्या उत्पादन खर्चावर उपाय म्हणून वीजदरवाढीचा प्रस्ताव दिला आहे.

आर्थिक वर्ष 2023 ते 24 साठी बेस्टने एमईआरसीकडे (महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोग) वीज दरवाढीचा प्रस्ताव सादर केला आहे. 18 टक्क्यांपर्यंत वीज दरवाढीचा प्रस्ताव सादर केल्याने मुंबईकरांच्या वीज बिलामध्ये 18 % पर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. यामध्ये घरगुती ग्राहकांसाठी 100 युनिट पर्यंत 18 % पर्यंत दरवाढीचा प्रस्ताव बेस्टकडून ठेवला आहे. तर 101 ते 300 युनिट पर्यंत 6% पर्यंत दरवाढीचा प्रस्ताव आहे. तर 301 ते 500 युनिट व त्यापुढे सुद्धा दोन टक्के पर्यंत वीज दरवाढ होण्याची शक्यता आहे. बेस्टने राज्य वीज नियामक आयोगाकडे सादर केलेल्या प्रस्तावानुसार, दुकाने, कार्यालये आणि इतर व्यावसायिक आस्थापनांसाठी दिलासा मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिक ग्राहकांसाठी बेस्टने ६ टक्के कमी दरवाढीचा प्रस्ताव दिला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com