Mumbai Ferry Boat Accident: एलिफंटाला जाणारी 'नीलकमल बोट' उलटली; बचावकार्या दरम्यानचे फोटो समोर
गेट वे ऑफ इंडियाकडून एलिफंटाला जाणारी एक प्रवाशी बोट उलटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बोटीमध्ये प्रवासी होते. तर त्यापैकी काही जणांना बाहेर काढण्यात यश आलं आहे. मुंबईच्या अरबी समुद्रामध्ये ही दुर्घटना घटलेली आहे. युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे.
गेट वे ऑफ इंडियाकडून अरबी समुद्रात एलिफंटाला जाणाऱ्या एका प्रवाशी बोटीला नौदलाची बोट धडकल्यानं ती प्रवाशी बोट उलटल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
बुडालेल्या बोटीचे नाव नीलकमल बोट असे होते तर बोटीत 75 ते 80 प्रवासी असल्याची माहिती समोर आली आहे. तर त्या नीलकमल बोट दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला आहे.
मुंबई पोलिस, नौदल, JNPT, Coast guard, यलोगेट पोलीस ठाण्याच्या 3 आणि स्थानिक मच्छीमार बोटींच्या सहाय्याने व हॅलीकॅाप्टर घ्या सह्यायाने मदत व बचाव कार्य सुरु आहे.
57 प्रवाशी उपचाराकरीता जेएनपीटी या ठिकाणी आहेत व 8 प्रवाशी कुलाबा पोलीस ठाणे यांनी सेंन्ट जॅार्ज हॅास्पिटल, मुंबई या ठिकाणी उपचाराकरीता दाखल करण्यात आले आहेत.