Mumbai : गोव्यातल्या आगीतल्या घटनेनंतर मुंबई अग्निशमन दलाची ‘विशेष अग्निसुरक्षा मोहीम’
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Mumbai) गोव्यातील एका नाईट क्लबमध्ये शनिवारी रात्री उशिरा भीषण आग लागली. या घटनेत 25 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर अनेक लोक जखमी असून जखमींना उपाचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या आगीच्या घटनेनंतर मुंबई अग्निशमन दलाकडून ‘विशेष अग्निसुरक्षा मोहीम’राबवण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.
नववर्षाच्या स्वागत समारंभांच्या पार्श्वभूमीवर ही खबरदारी घेण्यात आली असून नववर्षाच्या स्वागत समारंभांच्या पार्श्वभूमीवर 22 ते दिनांक 28 डिसेंबर 2025 दरम्यान ही मोहीम राबवण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.
या मोहिमेत आस्थापनांनी अग्निसुरक्षेबाबतच्या अटी व शर्ती यांचे अनुपालन केले नसल्याचे आढळून आल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अनेक हॉटेल्स्, आस्थापना, गृहसंकुल व इमारती, समुद्र किनाऱ्यावर कार्यक्रम, स्वागत सोहळ्यांचे आयोजन करण्यात येते. या पार्श्वभूमीवर अग्निसुरक्षेबाबत अधिक खबरदारी घेणे आवश्यक असल्याने ही मोहीम राबवण्यात येणार आहे.
Summery
मुंबई अग्निशमन दलाची ‘विशेष अग्निसुरक्षा मोहीम’
नववर्षाच्या स्वागत समारंभांच्या पार्श्वभूमीवर खबरदारी
22 ते 28 डिसेंबर करणार हॉटेल्स्, रेस्टॉरंट, पब, बारची तपासणी
