आज दहा गणपतींचा आगमन सोहळा; मुंबईतील 'हे' रस्ते राहणार बंद

आज दहा गणपतींचा आगमन सोहळा; मुंबईतील 'हे' रस्ते राहणार बंद

आज आणि उद्या मुंबईमध्ये 40 हून अधिक आगमन सोहळा पार पडणार आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

रिध्देश हातिम, मुंबई

आज आणि उद्या मुंबईमध्ये 40 हून अधिक आगमन सोहळा पार पडणार आहे. या आगमन सोहळ्यात मोठ्या प्रमाणाने मुंबईकर सामील होतात मात्र दुसरीकडे यामुळे मुंबईकरांना मोठ्याप्रमाणात वाहतूक कोंडीचा देखील सामना करावा लागतो. मात्र मुंबईकरांना वाहतूक कोंडीचा करावा न लागो म्हणून पोलिसांकडून शहरात कडक बंदोबस्त लावण्यात आला आहे9 सप्टेंबर(आज) जवळपास दहा गणपतीचे मिरवणूक निघणार आहे तर उद्या 10 सप्टेंबरला जवळपास 35 हून अधिक विविध मंडळाच्या गणेश मिरवणूक निघणार आहे.

चिंचपोकळीचा चिंतामणी गणपतीच्या आगनमानची मिरवणूक हे आज दुपारी दोन वाजता निघणार आहे. त्यामुळे शनिवारी दुपारी २ वाजल्यापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग हा कॉग्रेड कृष्णा देसाई चौक (भारतमाता जंक्शन) ते हंसराज राठोड चौक कंपाऊंड जंक्शन) वाहतूकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच साने गुरुजी मार्ग हा कॉमेड गणाचार्य जंक्शन (चिंचपोकळी जंक्शन) ते संत जगनाडे महाराज चौक (गॅस कंपनी) पर्यंत बंद राहाणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरुन सीएसएमटी ला जाणारी वाहने काँग्रेड कृष्णा देसाई चौक (भारतमाता जंक्शन) येथून करी रोड ब्रिज शिंगटे मास्तर चौक ना. म. जोशी मार्ग कॉग्रेड गणाचार्य जंक्शन (चिंचपोकळी जंक्शन अब्दुल हमिद अन्सारी चौक (खडा पारसी) येथुन दक्षिण मुंबईच्या दिशेने वळविण्यात येणार आहेत.

तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरुन दादरकडे जाणारी वाहने हंसराज राठोड चौक (बावला कंपाऊंड टि. बी. कदम मार्ग दत्ताराम लाड मार्ग श्रावण दादा यशवंते चौक जंक्शनमार्गे - साईबाबा पथ कॉग्रेड कृष्णा देसाई चौक (भारतमाता जंक्शन) येथून दादरच्या दिशेने वळविण्यात आली आहे. साने गुरुजी मार्ग अन्य वाहतूकीस बंद करण्यात आल्याने या मार्गावरुन कॉम्रेड गणाचार्य जंक्शन (चिंचपोकळी जंक्शन) येथून दादरकडे जाणारी वाहने ना. म. जोशी मार्गाने शिंगटे मास्तर चौक- करी रोड ब्रिज कॉम्रेड कृष्णा देसाई चौक (भारतमाता जंक्शन) मार्गे वळविण्यात आली आहेत. याबाबतीचे आदेश वाहतूक विभागाकडून आले आहे.

९ सप्टेंबर २०२३

1.ओम साई महेश पार्क (वसई)

2.कुंभारवाड्याचा राजा

3.मरोळ चा मोरया

4.चिराबाजारचा महाराजा

5. विलेपार्ल्याचा गणराज (कागदी मूर्ती - संकष्टीचा बाप्पा) मुर्तिकार - सागर चितळे

6 अटॉपहिलचा राजा ( गजमुख आर्ट्स बकरी अड्डा)

7 धोबीतलावचा महाराजा

8 ताडदेवचा विघ्नहर्ता ( अरुण दाते)

9 चिंचपोकलीचा चिंतामणी

10 उपनगराचा सम्राट ( कलगंध आर्ट्स )

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com