घाटकोपरमध्ये जलवाहिनी फुटली; या परिसरातील पाणीपुरवठा राहणार बंद
Admin

घाटकोपरमध्ये जलवाहिनी फुटली; या परिसरातील पाणीपुरवठा राहणार बंद

घाटकोपर येथील असल्फा पाईपलाईन विभागात ब्रिटिशकालीन 72 इंचाची जलवाहिनी फुटली. ही जलवाहिनी फुटल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे.

घाटकोपर येथील असल्फा पाईपलाईन विभागात ब्रिटिशकालीन 72 इंचाची जलवाहिनी फुटली. ही जलवाहिनी फुटल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. 30 डिसेंबर रोजी रात्री मुंबईतील असल्फा परिसरात लोक घरात झोपलेले असताना 72 इंचाची पाण्याची पाइपलाइन फुटली.

घाटकोपर उच्चस्तरीय जलाशयातून होणारा पाणीपुरवठा जलवाहिनी दुरुस्त होईपर्यंत बंद राहणार असल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे. जलवाहिनी दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू असून एन विभागातील काही ठिकाणी पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती महापालिकेने दिली आहे. घाटकोपर उच्चस्तर जलाशय – राम नगर, हनुमान नगर, राहुल नगर, कैलास नगर, संजय गांधी नगर, शंकर मंदीर, जय मल्हार नगर, शिवाजी नगर, आंबेडकर नगर, निरंकारी सोसायटी, वर्षा नगर, ए व बी कॉलनीचा काही परिसर, माझगाव डॉक कॉलनी, गंगावाडी गेट नंबर 2, सिद्धार्थ नगर, आंबेडकर नगर, साईनाथ नगर, पाटीदार वाडी, रामाजी नगर, भटवाडी, बर्वेनगर, काजू टेकडी, अकबरलाला कंपाऊंड, आझादनगर, पारसी वाडी, सोनिया गांधी नगर, खाडी मशीन, डी व सी म्युनिसिपल कॉलनी, रायगड विभाग, आनंदगड, यशवंत नगर, गावदेवी, पठाण चाळ, अमृत नगर, इंदिरा नगर 1 आणि 2, अमिनाबाई चाळ, गणेश मैदान, मौलाना कंपाऊंड, हरिपाडा, जगदुषा नगर, कठोडीपाडा, भीमानगर, अल्ताफनगर, गेल्डानगर, गोळीबार मार्ग, नवीन दयासागर, जवाहरभाई प्लॉट, सेवानगर, ओ. एन. जी. सी. कॉलनी, गंगावाडीचा काही परिसर या ठिकाणी पाणीपुरवठा बंद राहणार आहेत. अशी माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे

घाटकोपरमध्ये जलवाहिनी फुटली; या परिसरातील पाणीपुरवठा राहणार बंद
घाटकोपरमध्ये जलवाहिनी फुटली; मोठे नुकसान
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com