Mumbai-Goa flight: गोव्याहून मुंबईला येणाऱ्या विमानात बॉम्बची चिठ्ठी सापडल्याने खळबळ

Mumbai-Goa flight: गोव्याहून मुंबईला येणाऱ्या विमानात बॉम्बची चिठ्ठी सापडल्याने खळबळ

गोवा-मुंबई विमानात बॉम्बची चिठ्ठी सापडल्याने खळबळ; सर्व यंत्रणा सतर्क, एअरपोर्ट पोलीस तपासात गुन्हा दाखल.
Published by :
Prachi Nate
Published on

गोव्यावरून मुंबईत येणाऱ्या विमानांमध्ये बॉम्ब असल्याची चिठ्ठी सापडल्याने खळबळ, सोमवारी या घटनेनंतर सर्व यंत्रणा झाल्या सतर्क. तपासात काहीच संशयीत सापडले नसून याप्रकरणी एअरपोर्ट पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार अभिजीत सावंत एका खासगी विमान कंपनीत सहाय्यक व्यवस्थापक(सुरक्षा) पदावर कार्यरत आहेत.

सोमवारी रात्री गोव्यावरून मुंबईला येणाऱ्या विमानाच्या शौचालयात एक चिठ्ठी सापडली. त्यात इंग्रजीत काळजी घ्या, बॉम्ब असे लिहिण्यात आले होते. तर दुसऱ्या बाजूला सूड असे लिहिण्यात आले होते. विमान मुंबई विमानतळावर पोहोचण्यापूर्वी २० मिनिटे आधीही चिठ्ठी सापडली. गोव्याहून मुंबईला जाणारे इंडिगो फ्लाइट 6E5101 हे मुंबई विमानतळावर उतरल्यानंतर त्याला बॉम्बची धमकी मिळाल्यानंतर एका वेगळ्या खाडीत नेण्यात आले.

सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. याबाबतची माहिती विमान कर्मचाऱ्यांना दिली. वैमानिकांनी याबाबतची माहिती मुंबई विमानतळ नियंत्रण कक्षाला दिली. त्यामुळे विमानतळावर बॉम्ब शोधक व नाशक पथक, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, विमानतळ सुरक्षा पथक तैनात करण्यात आले.

विमान एअरपोर्टवर उतरताच ते आयसोलेट ठिकाणी उभे करून सर्व प्रवाश्यांना सुखरूप खाली उतरवण्यात आले. त्यानंतर विमानाची तपासणी केली असता कोणतीही संशयीत वस्तू सापडली नाही. प्रवाश्यांमध्ये भीती निर्माण करण्याच्या हेतून आरोपीने हा प्रकार केला असून त्याबाबत एअरपोर्ट पोलीस तपास करत आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com