मुंबई गोवा महामार्गावरील टोल आजपासून सुरू होणार; जाणून घ्या काय असणार दर
Admin

मुंबई गोवा महामार्गावरील टोल आजपासून सुरू होणार; जाणून घ्या काय असणार दर

मुंबई गोवा महामार्गावरील टोल आजपासून सुरू होणार आहे.

मुंबई गोवा महामार्गावरील टोल आजपासून सुरू होणार आहे. हातिवले टोलनाक्यावर सिग्नल यंत्रणाही बसवण्यात आली आहे. त्यामुळे महामार्गावरती राजापूर हातिवले येथे टोल वसुली सुरू होणार आहे. सकाळपासून या ठिकाणी टोलवसुली सुरू होणार असून NHAI ने या टोलवसुलीला परवानगी दिली आहे.

सर्वपक्षीय नेते तसेच स्थानिकांचा विरोध होता. आता टोलवसुली सुरळीत सुरु होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. नितीन गडकरी यांनी सांगितले की, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम डिसेंबर 2023 अखेर पूर्ण करणार असून जानेवारी 2024 मध्ये रस्ता वाहतुकीसाठी खुला होईल.

22 डिसेंबर ला स्थानिकांच्या विरोधामुळे टोल वसुली बंद केली होती. आता त्याची पुन्हा सुरुवात होत आहे. छोट्या गाड्यांसाठी तब्बल 90 रुपये मोजावे लागणार आहे. तर छोट्या गाड्यांच्या रिटर्न जर्नी साठी 130 रुपये मोजावे लागणार आहेत.

वाहनाचा प्रकार वनवे जर्नी रिटर्न जर्नी

कार 90 130

ट्रक, बस 295 445

3 एक्सल 325 485

एलसीवी / एलजिवी 140 210

ओव्हर साईझ एक्सल 565 850

HCM, EME 465 695

वाहनाचा प्रकार स्थानिक वाहन महिना दर

कार 45 2920

ट्रक, बस 150 9880

3 एक्सल 160 10775

एलसीवी / एलजिवी 70 4715

ओव्हर साईझ एक्सल 285 18860

HCM, EME 230 15490

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com