मुंबई गोवा महामार्गाचे काम 24 तास सुरू; डिसेंबर 2023 पूर्वी काम पूर्ण करण्याचे न्यायालयाचे आदेश

मुंबई गोवा महामार्गाचे काम 24 तास सुरू; डिसेंबर 2023 पूर्वी काम पूर्ण करण्याचे न्यायालयाचे आदेश

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम मागील काही वर्षांपासून बंद स्थितीत होतं.

लक्ष्मीकांत घोणसे - पाटील, रत्नागिरी

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम मागील काही वर्षांपासून बंद स्थितीत होतं. मात्र हे काम डिसेंबर 2023 यामध्ये ती पूर्ण करण्याचे आदेश न्यायालयाचे असल्याने सध्या या कामाला गती आलेली आहे. परशुराम घाटात 24 तास मशीनच्या माध्यमातून काम सुरू आहे. सुमारे 70 टक्के काम हे पूर्ण झालेल असून उड्डाणपूल आणि घाटाचं काम या कामाला वेळ लागण्याची शक्यता आहे.

मात्र हे काम डिसेंबर 2023 पूर्वी पूर्ण करायच असल्याने या कामाला गती आलेली आहे महामार्गाचे काम हे विविध टप्प्यांमधून केलं जात आहे रात्रंदिवस हे काम चालू आहे घाटामधून प्रवास करताना वाहन चालकांची दमछाक होते प्रचंड धुळीचा साम्राज्य आहे त्यातून मार्ग काढत वाहन चालकांचा प्रवास सुरू आहे.

परशुराम घाटात डोंगराची कटाई करत असताना डोंगराच्या संरक्षक भिंतीच काम युद्ध पातळीवर सुरू आहे पावसाळ्यात परशुराम घाटात दरड कोसळण्याच्या घटना घडत असल्यामुळे ठिकाणी संरक्षक भिंती मजबूत स्वरूपाच्या उभारल्या जात आहेत सुमारे दीड किलोमीटर लांबीची ही संरक्षक भिंत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com