डिसेंबर पर्यंत मुंबई गोवा महामार्गाचे काम पूर्ण होणार; सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांची घोषणा
Admin

डिसेंबर पर्यंत मुंबई गोवा महामार्गाचे काम पूर्ण होणार; सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांची घोषणा

गेल्या कित्येक वर्षांपासून रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाचं बांधकाम कधी पूर्ण होणार? असा प्रश्न प्रत्येक चाकरमान्याला पडतो.
Published by  :
Siddhi Naringrekar

चेतन ननावरे, मुंबई

गेल्या कित्येक वर्षांपासून रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाचं बांधकाम कधी पूर्ण होणार? असा प्रश्न प्रत्येक चाकरमान्याला पडतो. गणपती असो वा शिमगा प्रत्येक सणाला या महामार्गाअभावी कोकणवासीयांना कोल्हापूर मार्गे वळसा घालून जावे लागते.

कोकण रेल्वेने जायचं म्हटलं तर अवघ्या काही मिनिटांत तिकिटांचं बुकिंग फुल्ल होतं. आज सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण या महामार्गाची पाहणी करत आहेत. यंदाच्या गणेशोत्सवापूर्वी या महामार्गाची एक लेन खुली केली जाईल, अशी घोषणा त्यांनी लोकशाही सोबत बोलताना केली आहे. याउलट याचवर्षी डिसेंबर २०२३ पर्यंत संपूर्ण महामार्गाचे काम पूर्ण होईल, अशी शक्यता त्यांनी वर्तवली आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com