गोरेगावात भीषण आग, सात जणांचा मृत्यू; मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत

गोरेगावात भीषण आग, सात जणांचा मृत्यू; मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत

मुंबईतील गोरेगाव परिसरात पाच मजली इमारतीला आग लागल्याची घटना घडली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

मुंबईतील गोरेगाव परिसरात पाच मजली इमारतीला आग लागल्याची घटना घडली आहे. पाच मजली इमारतीत आगीने रौद्र रुप धारण केले. आग लागल्यानंतर घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत. आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या आगीत 7 जणांचा होरपळून मृत्यू झाला असून 58 जखमी झाले आहेत.

या दुर्घटनेची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. तसेच मृतांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत केली जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री शिंदे यांनी ट्विट करत म्हटले की, गोरेगावच्या उन्नत नगर येथील एसआरएच्या जय भवानी इमारतीला भीषण आग लागून झालेल्या दुर्घटनेत काही नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. यात काही लहान मुलांचाही समावेश आहे. ही घटना अत्यंत दुर्दैवी असून त्यात जीव गमवावा लागलेल्या नागरिकांप्रती मी माझी सहवेदना व्यक्त करतो.

या आगीच्या घटनेबाबत मुंबई महानगरपालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्तांकडून मी वेळोवेळी माहिती घेत असून मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर तसेच मुंबई उपनगरांचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांना प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देण्याचे निर्देश दिले आहेत. या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या मृतांच्या कुटूंबियांना शासनाकडून ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली असून, जखमी नागरिकांवर सरकारी खर्चाने वैद्यकीय उपचार करण्यात येतील.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com