Mumbai High Tide : आज दुपारी 1.22 वाजता यंदाच्या मोसमातील सर्वात उंच भरती येणार

Mumbai High Tide : आज दुपारी 1.22 वाजता यंदाच्या मोसमातील सर्वात उंच भरती येणार

मागील काही दिवस राज्यातील अनेक भागात रेड अलर्ट जारी करण्यात आला होता. मात्र आज रायगड, पालघर, पुणे, सातारा आणि कोल्हापुरात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. हे जिल्हे वगळता इतर जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कमी राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

मागील काही दिवस राज्यातील अनेक भागात रेड अलर्ट जारी करण्यात आला होता. मात्र आज रायगड, पालघर, पुणे, सातारा आणि कोल्हापुरात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. हे जिल्हे वगळता इतर जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कमी राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. काही जिल्ह्यांत अजूनही पूरस्थिती आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांत झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

आज पाऊस काहीसा थांबला आहे मात्र समुद्रातलं उधाण मात्र कायम आहे. यंदाच्या मोसमातली सर्वात उंच भरती आज समुद्रात असेल. दुपारी १ वाजून २२ मिनिटांनी समुद्रात भरती आहे आणि यावेळी समुद्रात ४.८७मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे. समुद्राला उधाण असल्यानं प्रशासनानं नागरिकांनाही सावधगिरीचा इशारा दिलाय. समुद्रकिनारी जाण्यावरही निर्बंध घालण्यात आले आहेत.

Mumbai High Tide : आज दुपारी 1.22 वाजता यंदाच्या मोसमातील सर्वात उंच भरती येणार
Maharashtra Political Crisis: शिवसेनेला पुन्हा खूप मोठं खिंडार, गोपाळ लांडगे शिंदे गटात सामील
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com