मुंबई व उपनगरांमध्ये गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे रेल्वे व विमान वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. आज सकाळपासून तिन्ही रेल्वे मार्गावरील सेवा पूर्णपणे ठप्प झाल्या आहेत.
महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर कायम असून अनेक भागात अतिमुसळधार पावसाची नोंद झाली आहे. हवामान खात्याने आज, 20 ऑगस्ट रोजीदेखील जोरदार पावसाचा इशारा दिला आहे.