घाटकोपर येथे निर्माणआधीन घराचा भाग कोसळून 8 जण जखमी

घाटकोपर येथे निर्माणआधीन घराचा भाग कोसळून 8 जण जखमी

घाटकोपर भटवाडी येथील एका घराची भिंत कोसळून आठ जण जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. या घराचे बांधकाम सुरू असताना ही दुर्घटना घडली आहे.

मुंबई : घाटकोपर भटवाडी येथील एका घराची भिंत कोसळून आठ जण जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. या घराचे बांधकाम सुरू असताना ही दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत जखमी झालेल्यांपैकी एकाही व्यक्तीची प्रकृती गंभीर नसल्याची माहिती मुंबई अग्निशमन दलाकडून देण्यात आली आहे.

घाटकोपर पश्चिम भटवाडी येथील आर बी कदम मार्गावर सायंकाळी साडेपाचच्या सुमारास बांधकाम सुरू असलेल्या घराची भिंत कोसळली. तळ अधिक एक मजली असलेल्या घराच्या भिंतीखाली आठ जण अडकले होते. या अडकलेल्या आठ जणांना जवळच्या न्यू लाईफ रुग्णालयात दाखल करण्यात आले. या आठही जणांवरती उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे. दुर्घटनेत बबन भोर 69 वर्ष, निर्मला भोर 55 वर्ष, सुरेखा भोर 38 वर्ष, रिंकू कनोजीया 29 वर्ष, रहमत अली 24 वर्ष, बबलू चव्हाण 28 वर्ष, धर्मेंद्र चव्हाण 18 वर्ष, बजरंगी यादव 45 वर्ष, अशी या जखमींची नावे आहेत. घराचे बांधकाम सुरू असताना भिंत कोसळल्याने झालेल्या दुर्घटनेत सुदैवाने कोणीही गंभीर जखमी झालेले नाही.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com