IPL 2024 Playoffs
IPL 2024 Playoffs

IPL 2024 : आरसीबी आणि मुंबई इंडियन्सला अजूनही प्ले ऑफमध्ये खेळण्याची संधी, 'असं' आहे समीकरण

यंदाच्या आयपीएल हंगामात काही संघांनी अनेक सामन्यांमध्ये विजयाची मोहोर उमटवल्याने त्या संघांचा प्ले ऑफचा मार्ग सुकर झाला आहे.
Published by :

IPL 2024 Playoffs : यंदाच्या आयपीएल हंगामात काही संघांनी अनेक सामन्यांमध्ये विजयाची मोहोर उमटवल्याने त्या संघांचा प्ले ऑफचा मार्ग सुकर झाला आहे. परंतु, काही संघ पराभवाच्या छायेत असल्याने प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्याच्या त्या संघांच्या आशा धूसर झाल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक सामन्यात विजय संपादन करण्याचा प्रत्येक संघाचा प्रयत्न आहे. तर ज्या संघांचा सातत्याने पराभव होत आहे, ते संघ प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर पडत आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि मुंबई इंडियन्सही आयपीएलमधून बाहेर होण्याच्या मार्गावर आहे. परंतु, मुंबई आणि बंगलोर संघाकडे अजूनही प्ले ऑफमध्ये जाण्याची संधी आहे. कशाप्रकारे हे दोन्ही संघ प्ले ऑफमध्ये प्रवेश करु शकतात, जाणून घेऊयात याबाबत सविस्तर माहिती.

गुणतालिकेत आरसीबी आणि मुंबई इंडियन्सची स्थिती

गुणतालिकेत मुंबई इंडियन्स आणि आरसीबी हे दोन्ही संघ खालच्या स्थानावर आहेत. मुंबई इंडियन्सने १० सामन्यांपैकी ३ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. त्यामुळे मुंबईचा संघ नवव्या स्थानावर आहे. तर आरसीबीनेही १० सामन्यांमध्ये फक्त ३ सामन्यांत विजय संपादन केलं आहे. त्यामुळे आरसीबीचा संघ गुणतालिकेत दहाव्या स्थानावर आहे. मुंबई इंडियन्सचा नेट रनरेट आरसीबीपेक्षा चांगला आहे. त्यामुळे आरसीबीचा संघ सर्वात खालच्या स्थानावर आहे. हे दोन्ही संघ पुढील होणारा एक जरी सामना हरले, तर या संघांसाठी प्ले ऑफचे दरवाजे कायमचे बंद होतील.

मुंबई इंडियन्स आणि आरसीबीचं प्ले ऑफमध्ये पोहोचण्याचं समीकरण

आरसीबी आणि मुंबई इंडियन्सला प्ले ऑफमध्ये प्रवेश करायचा असेल, तर त्यांना पुढे होणारे सर्व सामने जिंकावे लागतील. तसच दुसऱ्या संघांवरही त्यांना अवलंबून राहावं लागेल. राजस्थान रॉयल्स त्यांचे उर्वरित सर्व ५ सामने जिंकली, केकेआर दोन सामने, आरसीबी आणि मुंबई इंडियन्स उर्वरीत सर्व सामने, सीएसके आणि हैदराबाद एक-एक सामना, लखनऊ सुपर जायंट्स एकही सामना नाही, पंजाब किंग्ज तीन सामने आणि गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्सने एक एक सामना जिंकल्यास १४-१४ गुण मिळवून आरसीबी आणि मुंबई इंडियन्स प्ले ऑफमध्ये क्वालिफाय करतील.

'असं' आहे संपूर्ण समीकरण

RR - 26 pts (+5wins)

KKR - 16 pts (+2wins)

MI - 14 pts (+4wins)

RCB - 14 pts (+4 wins)

CSK -12 pts (+1win)

SRH - 12 pts (+1win)

SRH - 12 pts (+1win)

LSG - 12 pts (0wins)

DC - 12 pts (+1win)

PBKS - 12 pts (+3 wins)

GT - 10 pts (+1win)

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com