IPL 2024
IPL 2024

IPL मध्ये मुंबई इंडियन्सचा खेळ खल्लास! RCB चा संघही होणार टूर्नामेंटमधून बाहेर? गुणतालिका एकदा पाहाच

आयपीएल २०२४ मध्ये सनरायजर्स हैदराबाद आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात झालेल्या रंगतदार सामन्यानंतर प्ले ऑफमध्ये बदलाचे वारे वाहू लागले आहेत.
Published by :

IPL 2024 Points Table : आयपीएल २०२४ मध्ये सनरायजर्स हैदराबाद आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात झालेल्या रंगतदार सामन्यानंतर प्ले ऑफमध्ये बदलाचे वारे वाहू लागले आहेत. हैदराबादविरोधात लखनऊ सुपर जायंट्सचा दारुण पराभव झाल्यानं मुंबई इंडियन्स प्ले ऑफमधून बाहेर झाली आहे. आता मुंबईने त्यांच्या उर्वरीत दोन सामन्यांमध्ये विजय मिळवला, तरीही प्ले ऑफमध्ये पोहोचू शकत नाहीत. तसच लखनऊ सुपर जायंट्ससाठीबी प्ले ऑफचं गणित अवघड बनलं आहे. तर हैदराबादचा संघ गुणतालिकेत मजबूत स्थितीत आहे.

गुणतालिकेत 'अशी' आहे संघांची स्थिती

सनरायजर्स हैदराबाद या दणदणीत विजयानंतर तिसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे. चेन्नई सुपर किंग्ज चौथ्या स्थानावर आहे. तर दिल्ली कॅपिटल्स पाचव्या क्रमांकावर आहे. कोलकाता आणि राजस्थानने पहिल्या आणि दुसऱ्या नंबरसाठी त्यांचं स्थान कायम ठेवलं आहे.

IPL 2024 Points Table
IPL 2024 Points Table

मुंबई इंडियन्स बाहेर, लखनऊलाही मोठा धक्का

सनरायजर्स हैदराबाद विरोधात झालेल्या दारुण पराभवानंतर मुंबई इंडियन्सचा संघ प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर झाला आहे. मुंबई आतापर्यंत १२ गुणांपर्यंतच पोहोचली आहे. लखनऊ सुपर जायंट्सलाही या पराभवामुळं मोठा धक्का बसला आहे. त्यांनी उर्वरीत दोन सामने जिंकल्यास त्यांचे १६ गुणच होणार आहेत. अशा परिस्थितीत नेट रन रेट पाहिला जातो.

परंतु, दोन सामन्यांमध्ये मोठा पराभव झाल्यानं लखनऊचा रनरेट खालच्या स्थानावर पोहोचला आहे. लखनऊचा पराभव झाल्यानं सीएसकेचा प्ले ऑफचा मार्ग सुकर झाला आहे. जर त्यांनी उर्वरीत तीन सामन्यांपैकी दोन सामने जिंकले, तर रन रेटच्या आधारावर त्यांचा संघ प्ले ऑफमध्ये क्वालिफाय होईल.

RCB किंवा PBKS यांच्यातून एक संघ होणार बाहेर

आज आरसीबी आणि पंजाब किंग्ज यांच्यात सामना होणार आहे. आजच्या सामन्यात ज्या संघाचा पराभव होईल, तो संघ टूर्नामेंटमधून बाहेर जाणार आहे. दोन्ही संघांकडे ८-८ गुण आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com