Mumbai Local: मुंबई पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक! प्रवाशांचे झाले हाल...

Mumbai Local: मुंबई पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक! प्रवाशांचे झाले हाल...

मुंबई पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉकमुळे प्रवाशांचे हाल, अनेक गाड्या रद्द झाल्याने स्थानकांवर प्रचंड गर्दी.
Published by :
Prachi Nate
Published on

मुंबईच्या पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉकमुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल झाल्याच पहायला मिळालं आहे. आज पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक होता, त्यामुळे अनेक गाड्या रद्द झाल्या होत्या, त्यामुळे प्रवास करणाऱ्या नागरिकांची मोठी तारांबळ उडाली होती.

त्याचबरोबर विरार, नालासोपारा, भाईंदर, मिरा रोड आणि इतर स्थानकांवर मोठ्या प्रमाणात गर्दी पहायला मिळत होती. मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना मोठ्या प्रमाणात असुविधा सहन करावी लागली. रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी होती. गाड्या रद्द झाल्याने प्रवाशी, कुटुंबासह प्रवास करणाऱ्या नागरिकांना याचा मोठा फटका बसला.

रेल्वे प्रशासनाने सांताक्रुझ ते गोरेगाव स्थानकांदरम्यान सकाळी 10 वाजल्यापासून ते दुपारी 3 वाजेपर्यंत जलद मार्गावर पाच तासांचा जम्बो ब्लॉक घेतला होता. या ब्लॉकदरम्यान, जलद मार्गावरील गाड्या धीम्या मार्गांवर वळवण्यात आल्या होत्या. परिणामी, काही गाड्या रद्द करण्यात आल्या तर अंधेरी आणि बोरीवलीदरम्यान चालणाऱ्या काही गाड्या गोरेगावपर्यंतच मर्यादित होत्या.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com