Megablock on Transharbour
Megablock on Transharbour

Megablock on Transharbour : ट्रान्सहार्बर मार्गावर आज ‘मेगाब्लॉक’

Mumbai Local Megablock: आज ट्रान्सहार्बर मार्गावर मेगाब्लॉक. मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावर कुठलाही मेगाब्लॉक नसल्यानं प्रवाशांना दिलासा.

मुंबई : उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी आज ट्रान्सहार्बर रेल्वेवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या ट्रान्सहार्बर ठाणे - वाशी/नेरुळ अप आणि डाउन मार्गावर, मेगाब्लॉक असणार आहे. आज मध्य, पश्चिम, हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार नाही. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

ट्रान्सहार्बर मार्गावर मेगाब्लॉक

कुठे : ठाणे-वाशी / नेरुळ अप आणि डाऊन. (Thane-Vashi / Nerul Up and Down)

कधी : सकाळी 10.35 ते दुपारी 4.10 वाजेपर्यंत

कोणत्या मार्गांवर होणार परिणाम : ब्लॉक कालावधीत ठाणे ते वाशी (Vashi) / नेरुळ (Nerul)/ पनवेल (Panvel) अप आणि डाऊन लोकल सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. तर, रविवार मुख्य मार्गिकेवर आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नसेल.

रेल्वे रूळ, ओव्हरहेड वायर, सिग्नल यंत्रणेची देखभाल दुरुस्ती, या कामांसाठी आज ट्रान्स हार्बरवर मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे प्रवाशांना प्रवास करताना होणाऱ्या अडथळ्यांमुळे आणि गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासन दिलगीरी व्यक्त केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com